जग उदास त्या लागी I

जग उदास त्या लागी । जो की प्रेमाचा विरागी ॥
वैराग्याचे चर्मासन । वरी बसे संत जाण ॥
निजज्ञानाची माळ । जपे सदा सर्वकाळ  ॥
काळ जातसे चिंतने । भाव भक्तीच्या मार्गाने  ॥
तुकड्या म्हणे भेटा त्यासी । चुके चौऱ्यांशीची फाशी ॥