संत महंताच्या बोले I

संत महंतांच्या बोले । देव टाकीत पाउले ॥
कथन केले वेदश्रृती । ब्रह्मसूत्री अगणिती ॥
त्यांच्या न्याये देव चाले । फळ देई योग्य भले ॥
तुकड्या म्हणे अधिकार । नाही दोघांसी अंतर ॥