हरि भक्तीचे सोहळे l

हरि भक्तीचे सोहळे । भक्ता भाविकासी कळे ॥
येर काय जाणे त्यासी । नाही जया त्याची खुशी ॥
मार्गी निंदिती निंदक । कोण घाली तया भीक ? ॥
तुकड्या  म्हणे आम्ही दीन । करू त्यांचेचि चिंतन ॥