करा वैष्णवांसी गडी I

करा वैष्णवांसी गडी । देव लाभेल तातडी ।।
नका फिरू रानावना । धरा संतांच्या चरणा ॥
नाम घ्यारे नाम घ्यारे । काम क्रोधासी जिंका रे ।।
तुकड्या म्हणे तोचि बळी । जो का गोपाळांच्या मेळी ॥