रोधुनिया मन प्राण एके ठायी

रोधुनिया मन-प्राण एके ठायी ।
हृदयस्थ राही योगीराज ।।
ओंकाराचा जप करी श्वासोश्वासी ।
बाहेरी चीत्तासी भ्रमों न दे ।।
एकांती लोकांती विषम वागणे । 
हांरणे रुसणे नसे त्यासी ।
तुकड्यादास पे गंभीर मनाचा । 
तोची जनाचा नेता होई ।