जाणोनि न बोलें राहे आपणासी
जाणोनी न बोले राहे आपणाशी !
नित्य श्वासोश्वासी हरी गाये |
लागों नये जग-पाश अंगावरी ।
म्हणोनिया दुरी दुरी पळे ॥
पिशाच्चाचे रूप धरी बाहेरून ।
अंतरी निमग्न पांडुरंगी ॥
तुकड्यादास म्हणे विरळे जाणती ।
त्यासी वाखाणती प्रेप-भावे ॥