ठेवा अंतरी विश्वास I

ठेवा अंतरी विश्वास ।  देव दाखवी पायास॥
भुलू नका दुजाकडे । देव होतील वाकडे  ॥
करू नका लोभ दुजा । भजा पंढरीचा राजा ॥
तुकड्या म्हणे भाव फळे । ऐसे रूप हे सावळे ॥