सकल मायेचे मइंद I

सकल मायेचे मईंद । विरळा भजतो गोविंद ॥                काय संत मिळे हाटी । मोल देवोनिया कोटी ॥
मोले मिळतील भोंदु । ज्यांना दक्षिणेचा स्वादु ॥
तुकडया म्हणे जो निष्काम । तेथे जाणा प्रभु-प्रेम ॥