चित्त वाटले वाटणी I

चित्त वाटले वाटणी । भक्ति-अंश नाही मनी ॥
काही संसारासी दिले । काही देहाने घेतले ॥
काही इष्ट मित्रा पाशी । काही जनाचिया आशी ॥
तुकड्या  म्हणे भक्ति करी । काय देवासी दे उरी? ॥