घ्यावे औषधीचे पाणी I

घ्यावे औषधीचे पाणी । गुरळी टाकावी थुंकोनि ॥
पोटी न घालता कण । कैसा येई त्याने गुण? ॥
तैसे आहे हरिचे नाम । बोधाविण हे बेकाम  ॥
तुकड्या म्हणे भावे भजा । माझा पंढरीचा राजा ॥