ओतुनि पाण्याचे भांडार I

ओतुनि पाण्याचे भांडार । देह नोहे थंडगार  ॥
जरि पाणी पोटी घ्यावे । तरीच शांति आत पावे ॥
तैसी हरिची आहे कथा । नोहे वरवरी सांगता  ॥
तुकड्या म्हणे बोध घ्यावा । हृदयी दिवा पाजळावा ॥