तेचि भक्तीचे कौतुक ।

तेचि भक्तीचे कौतुक । भाव उठती सात्विक ॥
कंठ दाटे गहीवरे । अंगी काटे उठती सारे  ॥
नेत्री लागे जलधार  । पडे देहाचा विसर  ॥
तुकड्या म्हणे दिसो नेदी । तरी नावरे ही धुंदी ॥