रूचि लागली अंतरी I

रुचि लागली अंतरी । कळली हरिनामाची थोरी ॥
झाली सावधान मनी । उभा राहिला कीर्तनी ॥
अष्टभाव कंठी आला । नेत्री झरा सुरू झाला ॥
तुकड्या म्हणे त्याची भक्ति । सहित तारी जनाप्रती ॥