वाट चालावी आपुली I

वाट चालावी आपुली । दृष्टि फिरवू नये खाली ॥
सरळ ठेवावे वर्तन । फिरवू नये विषयी मन ॥
मनावरी व्हावे स्वार । बांधूनिया ज्ञान-दोर ॥
तुकड्या म्हणे ऐसे होता। लाभतसे अखंडता ॥