हेत एकचि अंतरी I

हेत एकचि अंतरी । सखा लाभो हृदयांतरी ॥
हृदयांतरी भेटो राम। पूर्ण होवो सर्व काम ॥
कामे काम नष्ट होवो । वाचा श्रीहरिसी गावो ॥
गावो वाचा मनासवे । तुकड्या म्हणे हे गोडवे ॥