जवळ आहे परि दुरी I

जवळ आहे परी दुरी । माझा पंढरीचा हरि ॥
जे जे पाहती अंतरी । त्यासी भेटे तो गिरिधारी  ॥
जे नर फिरती बाहेर । त्यांना शांति ना तिळभर ॥
तुकड्या म्हणे स्थिर होता । देव पाही हा पाहता ॥