सकळ देवांचाहि देव I

सकळ देवांचाहि देव । अंतरीचा हा केशव ॥
याच देवे सर्व देव । ऐसा वेदांताचा भाव ॥
परी हा न जाणे आपणा । फिरे मनाच्या अंगणा ॥
तुकड्या म्हणे सर्वसाक्षि । शुद्ध आत्मा हृषिकेशी ॥