जीव अध्यासे नाडला I

जीव अध्यासे नाडला । हवा अभ्यास तयाला ॥
सोडूनिया बाह्य रंग । तया द्यावा संतसंग ॥
यमनियमादि बंध । तया घालावे सुबंध  ॥
तुकड्या म्हणे तरीच फळे । जीवा शिवाते आकळे ॥