जीव नाडला नाडला I

जीव नाडला नाडला । विषय चिंतायासी गेला ॥
गेला मनाचिया सवे । मोहूनि इंद्रिय - लाघवे   ॥
भुलला अमृताचा झरा । कुंभिपाकी करी फेरा ॥
तुकड्या म्हणे संतापायी । जाया मार्ग दावा काही ॥