जीव ब्रम्ह दोन नाही I

जीव ब्रह्म दोन नाही । कळे अनुभव संतांपायी ॥
शास्त्रे वाच्य-साक्ष देती । संत प्रत्यक्ष दाविती ॥
दाविताती लक्षांशासी । पाहणे लागे आपुल्याशी ॥
तुकड्या म्हणे मुरला भेद । दोन्ही मूळचे अभेद  ॥