त्याने रचना कैसी केली I

त्याने रचना कैसी केली। कोण काय जाणे खोली ॥
सर्व आपणचि झाला । नरनारी गमे भला ॥
आपणचि कर्मे करी । आपणचि भोगी हरि ॥
तुकड्या म्हणे साक्षि न्यारा । राहे आपणचि साजिरा ॥