सकळ आनंदी आनंद I

सकळ आनंदी आनंद । अवघा भरला परमानंद ॥
सकळ  नटला माझा हरि । जीव जंतु नरनारी ॥
सकळ सुख दुःखे  गति । त्याचे सत्तेने चालती ॥
तुकड्या म्हणे गार पाणी । भिन्न नुरे ज्ञानांगणी ॥