सकळ झाला माझा हरि I

सकळ झाला माझा हरि । होता इच्छाचि अंतरी  ॥
काय उणे आहे त्यासी । पावे इच्छिले मानसी  ॥
आपापणी खेळ खेळे I जीव निर्मोनी सगळे   ॥
तुकड्या म्हणे हे जो जाणी । तोचि जाणावा निजज्ञानी ॥