सकळ माझा हरि खेळे I
सकळ माझा हरि खेळे I मिळुनी जीव हे गोपाळे ॥ भिन्न घेऊनिया सोंगे I खेळ खेळे नाना रंगे ॥ परि हा न कळे अज्ञाना I ह्या तो ज्ञानी जाणे खुणा ॥ तुकड्या म्हणे करिता भक्ति Iकळे वर्म हे निश्चिती ॥