सत्संगाविण ज्ञान मिळेना, सद्गुरु-बोधाचे ।
(चाल: पतीतपाव नाम..)
सत्संगाविण ज्ञान मिळेना, सद्गुरु-बोधाचे ।
करावया सत्संग पाहिजे, वाचन शास्त्राचे |।धृ० ।।
शास्त्र वाचण्या अधी पाहिजे, सेवा वडिलांची ।
सेवा करण्या अधी पाहिजे, जोड वागण्याची ।।९ ।।
वागायाचे निश्चय करण्या, प्रेम हवे आधी ।
प्रेम व्हाया प्राप्त पाहिजे, मुळचीच बुध्दी 11२1।
बुध्दि व्हावया प्रगट पाहिजे, जोड सुदेवाची।
देव मिळाया गड्या ! पाहिजे, कर्मे पूर्वीची ।।३॥।
तुकड्यादास म्हणे ही सांगड, कोटीजन्माची ।
तरिच फळे सद्गुरुकूपा, ती अंतर्ज्ञानाची ।।४॥।