जरी मूळचाची ब्रह्म |

जरी मूळचाचि ब्रह्म । मग का वाहतोसी भ्रम ! ॥
अज्ञानाचे भरसी वाटे । तव तू ब्रह्म कैसा नेटे ॥
व्हाया ब्रह्माचा अधिकार । होई लक्ष्यी तदाकार ॥
तुकड्या म्हणे करी सेवा । काटा काटिये काढाया ॥