करिसि कासया गड्या ! असा सत्संग तरी खोटा ?।

(चाल: पतीतपावन नाम..)
करिसि कासया गड्या ! असा सत्संग तरी खोटा ?।
जरा शांति ना मिळे जिवा, अभिमान चढे उलटा ।।धृ० ।।
मी ज्ञानी मी शहाण वाटे ज्याच्या चित्तासी ।
तो सत्संगी नव्हे, बोलुनी जगी करी हासी ।।१॥।
लाडू - पेढे, दूध -मलीदा, पाहतो खायासी ।
ज्ञान-मार्ग कधि जरा न सेवी, विषयाचा होशी ।1२॥।
वेदांताच्या मारि किलोंड्या, त्याग नसे ज्यासी ।
भक्ति-झरा तर मुळीच नाही, आल्या जन्मासी 11३ ।।
सत्कर्माचा बीट वाटतो, मीच ब्रह्म म्हणतो ।
सत्पुरुषांच्या तोंडि लागुनी, संत-संग करितो ।।४॥।
तुकड्यादास म्हणे ऐसे जन, बहु झाले जगती ।
नव्हे, नव्हे सत्‌-संग करी आयुष्याची माती ।1५ ।।