वेदांताचि उपासना I

वेदांताचि उपासना ।   मीचि  ब्रह्म ही भावना ॥
आधी सेवकचि नाही । ब्रह्म भाव कैसा राही ! ॥
शिरी रज धूळ घ्यावी । तेणे महंती पहावी ॥
तुकड्या म्हणे जीवासाठी । करणे लागे आटाआटी ॥