मिळे अधिकारेचि फळ I

मिळे अधिकारेचि फळ । ऐसा न्याय हा सकळ ॥
फुके नोहे ब्रह्मज्ञान । कोणी आणिल्या मागोन ॥
त्यासी लागे जीव द्यावा । तेव्हा मिळे ब्रह्म ठेवा ॥
तुकड्या म्हणे घ्यारे नाम । सकळ सिद्धि जाय काम ॥