रंग आला रंग आला I

रंग आला रंग आला । रंग आला भाविकाला ॥
ज्ञानी पाहतो दुरून । पाही पात्रापात्र ज्ञान  ॥
जाती नाही मति नाही । कैसा रंग यासी येई ? ॥
तुकड्या म्हणे भोळा भाव । तेणे प्रसन्न पंढरीराव ॥