अजागळाचिये परी I

अजागळाचिये परी । ज्ञानी पंडीतांची थोरी ॥
जया अंगी नाही प्रेम । त्यासी कैचा पावे राम ॥
प्रेमभक्तीचा भुकेला । देव भाविकांचा झाला ।।
तुकड्या म्हणे ज्ञानभक्ती । मिळवूनी रंगवा श्रीपती ॥