जीव जातो जीवनाविण I

जीव जातो जीवनाविण । तैसे भक्तीविना ज्ञान ॥
एक आहे एक नाही । त्याचे कार्य नाही ग्वाही ॥
कोरे ज्ञान कोरी भक्ति । जाय अंध श्रद्धेहाती    ॥
तुकड्या म्हणे ही सांगड । घालुनि चढावा भवगड ॥