दिवा प्रकाशी सर्वांशी I

दिवा प्रकाशी सर्वांसी । खाली आंधाराची राशी ॥
तैसे बोलू जाणे ज्ञान । नाही तया समाधान ॥
जैसी पात्रा नाही रुचि । मैत्री असता पक्वान्नाची ॥
तुकड्या म्हणे आर्त व्हावे । भक्ति रसाते साधावे  ॥