व्हावे निर्मळ अंतरी I

व्हावे निर्मळ अंतरी । मग वाचावी ज्ञानेश्वरी  ॥
दृढ धरूनिया भाव । पहावा ओवीचा गौरव  ॥
अंगी ल्यावे अष्टभाव । मनी चिंतावा पंढरीराव ॥
तुकड्या म्हणे तरीच कळे । ज्ञानेश्वरीचे सोहळे ॥