आम्ही ऐकू गेलो पोथी I

आम्ही ऐकू गेलो पोथी । ऐका पोथीची ती रीति ॥
बुवा पाहे पोथीकडे । लक्ष द्रव्यार्थी वाकडे  ॥
आम्ही पाहू त्याचे चिन्ह । मन होय उदासीन  ॥
तुकड्या म्हणे वृत्ती पाजी । देव कैसा होई राजी? ॥