एका पोथीच्या भरवसे I

एका पोथीच्या भरवसे । शिष्य करी शेकडोशे ॥
अंगी नाही भक्तिबळ । तोंडी बोलचि केवळ ॥
नाही शुद्ध आचरण । जाय विषयामाजी मन ॥
तुकड्या म्हणे ऐशा जनी । शिष्य होऊ नये कोणी ॥