चाटे मिष्टानाचे ताट ।

चाटे मिष्टानाचे ताट। जरा न सोसवे कष्ट ॥
काम करायासी आले । पळ काढती कुशल बोले ॥
बह्मज्ञानाच्या गपोंड्या । मारी भाषणी रोकड्या  ॥
तुकड्या म्हणे ऐसे नोहे । भक्ति लाभे जळता देहे ॥