घरोघरी ब्रह्मज्ञान ।

घरोघरी ब्रह्मज्ञान । चाले वाटेने व्याख्यान  ॥
कोणी कोणाचे न माने । ज्ञान गावे ज्याने त्याने ॥
सर्व गुरुंचा सुकाळ । शिष्य व्हाया पडला काळ ॥
तुकड्या म्हणे ऐसे तोंडे । होती भरता कानकोंडे ॥