ठक मिळे एक एके ।

ठक मिळे एक एके । कोणी कोणाचे ना ऐके ॥
एक सांगे शहाणपण । दुजा म्हणे तू रे कोण ?॥
आधी आपण वागावे । तरीच लोका उपदेशावे ॥
तुकेड्या म्हणे वाया जाती । दोघे छिद्रचि पाहती ॥