सांभाळोनि अपुले घर I

सांभाळोनि अपुले घर । मग रक्षावे परद्वार  ॥
नाही आपुली उन्नति । काय बोलो जनाप्रती ? ॥
आधी अध्यात्म-जीवन । पुढे समाज कारण  ॥
तुकड्या म्हणे मुखीचा घास । फेकुनि होऊ नये उदास ॥