सदा तुझ्या चिंतनी रहावे, वाटे गुरुराया!
सदा तुझ्या चिंतनी रहावे, वाटे गुरुराया!
प्रारब्धाचा भोग चुकेना, भ्रमवी अवनी या॥धृ०।।
सखा सहोदर पाहु कुठे तरि? म्हणतो जिव माझा।
जे भेटति ते स्वार्थी लोभी, कोणि न ये काजा ।।१।।
महाकाळ विक्राळ काम हा, भोवति घे घिरट्या |
संतसंग किति करु कळेना, पळहि न ये वाट्या।।२॥।
जिकडे तिकडे मी मोठा, मी मोठा ही वाणी।
भक्तिवर्म ते न दिसे कोठे, दु:खाची खाणी।।३॥।
तुकड्यादासा तुझा भरवसा, मग कोणी नाही।
सख राख रे ब्रीद. दयाळा ! आलो तव पायी ।।४।।9