आपत्काली धैर्य नसावे, ब्रीद कसे तुमचे ?

आपत्काली धैर्य नसावे, ब्रीद कसे तुमचे ?।
साच बोलुनी साचचि करशी वाटे मज साचे।!धृू० ।।
श्रती-वेद बहु शास्त्रे वर्णिति भक्ती प्रिय तुजला ।
याविण काहीच न रुचे आणिक, सत्य बोल मजला ।।1 ।।
राख राख प्रभू! लाज आज रे ! घे पोटी पापी।
तुकड्यादास म्हणे मी उरलो, पायी संतापी।।२॥।