दवडु नको रे ! रत्न गवसले, दगडाचे पोटी ।
दवडु नको रे ! रत्न गवसले, दगडाचे पोटी ।
पाहि दगड शोधुनी, लाव संधान तनूकाठी ।|धृ०।।
शरिराचे शरिरात शोधुनी, आत शरिर पाही ।
आंतर शरिरी नेत्र प्रगटती, किति देऊ ग्वाही ।।९ ।।
तोचि नेत्र पाहता उमेचा, वर शंकर धाला ।
त्रैलोक्याचे जहर प्राशिता, भय नाही त्याला ।।२॥।
नेत्राचे बिंदुले शोधता, हरपे मन-दृष्टी।
जोवरि न मिळे नेत्नि नेत्रिया तोवरि तू कष्टी ।।३।॥।
सोड पाश हा धर्म-कर्म-संस्कार खटाटोपी ।
पाहि गड्या ! डोळ्याचा डोळा प्रगट दिसे आपी ।।४ ।।
धन्य धन्य ते गुरुराज, वेभवी स्वरूपाचे ।
तुकड्यादासा दिला ठाव, नित तत्-स्वरूपी नाचे ।1५ ।।