हो जागा, का निजला सखया ! अज्ञानामाजी? ।
हो जागा, का निजला सखया ! अज्ञानामाजी? ।
विसरुनिया संधान आपुले, केला भव राजी ॥|ध०।।
सुख नाही, सुख नाही बापा! या झोपेमाजी ।
लावुनि घेशी खटपट मागे, मग करिशी हाजी ।1९॥।।
नरजन्माची वेळ गमवुनी, का बनशी पाजी? |
समज अता तरि, सत्संगाने अनुभव घे आजी ।।२॥।
आत्मस्वरूपी स्थीर होउनी, सोडी जग-लाजी ।
अंतर्मुख कर वृत्ति आपुली, धर निश्चय आजी ।।३ ।।
तुकड्यादास म्हणे का फिरशी ?धरि गुरूचरणा जी! ।
सत्चित्रररूप सोडुनी राहशी, चोरांच्या शेजी ।।४।|।