ठेवु कुणावर भार? कन्हैया!।
ठेवु कुणावर भार? कन्हैया!।
कोण करिल उपकार? कन्हैया!।।धृू०।।
स्वार्थलोभी ही जनता सारी, मज तारक कोणि न मुरारी!
जीव कसा जगणार? कन्हैया! ।।२।।
जिकडे पहावे तिकडे माया, मोहविकारे जळते काया ।
भक्ति कशी घडनणार? कन्हैया ! ।।२।।
तुकड्यादास म्हणे दीन आम्ही, लावी देह सख्या! तव कामी ।
मज तुचि उद्धरणार कन्हैया ! ।।३।।