सोडु नको मज तू गिरिधारी!

सोडु नको मज तू गिरिधारी!
दूर करो ही जनता सारी।॥धू०।।
जन म्हणोत मज वेडा झाला, तरि न दुःख मम होई मनाला ।
परि न तुझी मर्जी हो न्यारी ।।२॥।
म्हणतिल मज जरि ठेवु उपाशी, तरि तू रमशिल ना मजपाशी ?
तोडु नक्को अंतरिची तारी ।। २ ॥।
पाहो मज वैऱ्यापरि कोणी, तरि त्याची तिळ न धरी ग्लानी
तुकड्याचे भय -दु:ख निवारी।।३॥।