उगीच बरळू नये कोणी ।

उगीच बरळू नये कोणी । प्रभु साधे आमुच्यानी ॥
बहुत पडले ऐसे जन । ज्यांनी केला अभिमान   ॥
नव्हे पोरांचे खेळणे । खेळवावे हाते कोणे    ॥
तुकड्या म्हणे महाअग्नी । जाणे लागे त्याच्यातुनी ॥