तप्त लोखंडाचा खांब ।

तप्त लोखंडाचा खांब । आयुष्यवरी गमे लांब ॥
आहे कितीक योजने । हे तो विठ्ठलचि जाणे ॥
चढणे लागे त्याच्यावरी । तैचि पावेल श्रीहरि  ॥
तुकड्या म्हणे यारे । कोण चालतो सामोरे     ॥