घरचे बोलणे निराळे ।

घरचे बोलणे निराळे ।  आम्ही जिंकू काळा बळे ॥
प्रसंग पडता रणांगणी । छाती बडवी तो भिवोनी ॥
कारे गोमा ! काय झाले  । म्हणे ऐसे ना पाहिले  ॥
तुकड्या म्हणे परमार्थ । पोकळ वाटे प्रपंचात   ॥