अंगी नसावी महंती ।

अंगी नसावी महंती । दुःख वाटो नये खंती ॥
लोक लाज वगळोनी । सदा रहावे कीर्तनी ॥
गावे पंढरीच्या राया। रंगी रंग लावोनिया ॥
तुकड्या म्हणे तैच तरावे । संसारासी उद्धरावे ॥